विदर्भस्तरीय त्रिपदी परिवार सत्संग
- Read more about विदर्भस्तरीय त्रिपदी परिवार सत्संग
- Log in or register to post comments
विदर्भस्तरीय तरुणाई मेळावा (वयोगट १७ ते ३५)
- Read more about विदर्भस्तरीय तरुणाई मेळावा (वयोगट १७ ते ३५)
- Log in or register to post comments
संपर्क
आमचा पत्ता -
आनंदघन आध्यात्मिक बहु. सेवाभावी संस्था
(रजि. नं. एफ २९५६२) अमरावती
आनंदघन निवासी श्री चे विश्रांती स्थान, राजहिल नगर,
एम.आय.डी.सी. रोड अमरावती. महाराष्ट्र.
ईमेल - anandghanabs@gmail. com
दूरध्वनी संपर्क क्र. - ९५२७८५४८६०,
९६०७८१६४६२,
९४२०७२१४८९,
९९२२५७१०६१,
८३०८३३४६६२
विशेष उल्लेखनीय
ll श्री समर्थ ll
आनंदघन निवासी श्रींच्या विश्रांती स्थानाची (नित्यक्रम) दैनंदिनी
विश्रांती स्थानी सद्गुरुंची भूपाळी व काकडआरती सकाळी ७ वा.
श्रींचे यथासांग पूजन, अल्पोपहार आणि आरती.
पूजाविधी सेवाधारी 'श्री श्याम जुमळे (नियमित उपासक)
दुपारी १२.३०
- (भोजन प्रसाद) -श्रींचा नैवेद्य
महाआरती
१.४५ ते ३.४५ श्रींची वामकुक्षी
दुपारी ३.४५ श्रींची बावन्नी आणि चहापान
सायं. ७वा-
महाआरती ८ वा-भोजन
प्रसाद / फलाहार / दुग्धपान
रात्री ९.30: श्रीची शेजारती / पसायदान
।। श्री गजानन महाराज अष्टक (दासगणूकृत) ।।
गजानना गुणागरा परम मंगला पावना ।
अशींच अवघे हरी, दुरीत तेवि दुर्वासना ।।
नसें त्रिभुवनामधे तुजविन आम्हां आसरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।१।।
निरालसपणें नसे घडलि अल्प सेवा करी ।
तुझी पतितपावना भटकलो वृथा भूवरी ।
विसंबत न गाय ती आपुलिया कधीं वांसरा ।
करी पदनातावरी बहु दया न रोषा धरा ।।२।।
अलास जगीं लावण्या परतुनी सु-वाटे जन ।
समर्थ गुरूराज ज्या भुषवि नाम नारायण ।।
म्हणून तुज प्रार्थना सतत जोडुनिया करा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।३।।
क्षणांत जल आणिले नसून थेंब त्या वापिला ।
- Read more about ।। श्री गजानन महाराज अष्टक (दासगणूकृत) ।।
- Log in or register to post comments
।। श्री गजानन महाराज बावन्नी ।।
जय जय सद्गुरू गजानना । रक्षक तुची भक्तजना ।।१।।
निर्गुण तू परमात्मा तू । सगुण रूपात गजानन तू ।।२।।
सदेह तू परि विदेह तू । देह असूनि देहातीत तू ।।३।।
माघ वद्य सप्तमी दिनी । शेगांवात प्रगटोनी ।।४।।
उष्ट्या पत्रावळी निमित्त । विदेहत्व तव हो प्रगट ।।५।।
बंकटलालावरी तुझी । कृपा जाहली ती साची ।।६।।
गोसाव्याच्या नवसासाठी । गांजा घेसी लावुनी ओठी ।।७।।
तव पदतीथें वाचविला । जानराव तो भक्त भला ।।८।।
जानकीरामा चिंचवणे । नासवुनी स्वरूपी आणणे ।।९।।
मुकिन चंदुचे कानवले । खाऊनि कृतार्थ त्या केले ।।१०।।
- Read more about ।। श्री गजानन महाराज बावन्नी ।।
- Log in or register to post comments
।। श्री गजानन महाराजांची आरती ।।
जय जय सतचितस्वरूपा स्वामी गणराया l
अवतरलासी भूवर जड़ -मूढ ताराया ll
जयदेव जयदेव ll धृ.ll
निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी l
तें तूं तत्त्व खरोखर नि:संशय अससी l
लीलामात्रे धरिले मानवदेहासी ll १ ll
होऊ न देशी त्याची जाणिव तू कवणा l
करुनि 'गणि गण गणात बोते' या भजना l
धाता नरहरि गुरुवार तूची सुखसदना l
जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नयना ll २ ll
लीला अनंत केल्या बंकटसदनास l
पेटविले त्या अग्नीवाचुनि चिलमेस l
क्षणात आणिले जीवन निर्जल वापीस l
केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ll ३ ll
- Read more about ।। श्री गजानन महाराजांची आरती ।।
- Log in or register to post comments