जागतिक सद् भाव जागृती संमेलनासंबंधी ची दुसरी सभा संपन्न
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जयंती निमित्त आनंदघन निवासी श्रींचे विश्रांती स्थान मंगळ वार दिनांक ३०/०४/२०२४ रोजी तुकडोजी महाराजांना अभिवादन करून जागतिक सद् भाव जागृती संमेलनासंबंधी ची दुसरी सभा संपन्न झाली.
ईशा वास्यम, श्री.गजानन महाराज मंदिराचे, नाथ सखा वृंद परिवाराचे आणि श्रीमद् भगवद्गीता सामुहिक पठण महिला गटाचे सदस्य वगळता इतर भक्त परिवाराचे कार्यकारी प्रमुख सभेला उपस्थित होते. कार्यकारी प्रमुखांची सभा सायं.०७ वा. श्रींच्या विश्रांती स्थानी सामुहिक आरतीने प्रारंभ झाली.सभेत उपस्थित कार्यकारी प्रमुखांनी उपलब्ध झालेले परराष्ट्र तील ई-मेलआयडी तसेच महाराष्ट्रातील व महाराष्ट्रबाहेरच्या राज्यातील संबंधितांचे व्हॉट्स ॲप नंबर्स सभेत दिलेत.
दिनांक १०/०५/२४ अक्षयतृतीया पर्यंत मुदतवाढ निश्चित करून इतर कार्यकारी प्रमुखांनी वरीलप्रमाणे ई-मेलआयडी द्यावेत,तसेच उपस्थित कार्यकारी प्रमुखांनी दि.१०/०५/२४ पर्यंत प्रत्येक परिवाराची ११ कार्यकारी प्रमुखांची यादी निश्चित करून ती आनंदघन संस्थेला लेखी स्वरूपात द्यावी आणि प्रत्येक भक्त परिवारातील ११ किंवा त्यापेक्षा अधिक प्रमुखांनी प्रत्येकी रु.३१००/- सहयोग राशी जमा करून रू.५००००/- पर्यंत ची रक्कम जमा होताच संस्थेच्या सेंट्रल बँकेच्या खात्यात ७ किंवा ९ महिन्याच्या मुदती वर फिक्स डीपॉ झिट करण्याचे निश्चित झाले.
आनंदघन अध्यात्मिक बहु.सेवाभावी संस्थेचे २१ कार्यकारी प्रमुख निश्चित करण्यात आले.या संस्थेच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष आणि सह कोषाध्यक्ष यांनी सभेला मार्गदर्शन केले.पुढील सभेत दि.०१/०२/२०२५ ते ०५/०२/२०२५ या पंच दिवसीय जागृती सद् भाव जागृती संमेलनाचे स्वरूप स्पष्ट केले जाईल.पसायदानाने सभेची सांगता झाली.
कार्यकारी समिती
आनंदघन अध्यात्मिक बहु.सेवा.संस्था, अमरावती