जागतिक सद्भाव जागृती संमेलनासंबंधी आवाहन
शुक्रवार दि २९.०३.२४ ची सार्व सभा श्री मनोर मांगल्य मंगल कार्यालय, MIDC रोड अमरावती येथे सापं ०५ ते ६.३० या कालावधीत संपन्न होत आहे. सभेसाठी निर्देशित सलांग भक्त परिवार सादर आमंत्रित आहेत.
(अ) आनंदघन आध्या बहु सेवाभावी संस्थेचा (आनंदधन निवासी श्रीचे विश्रांती स्थानाचे सर्व पुरुष / महिला भक्त) सर्व
भक्त परिवार
(ब) श्री संत अच्युत महाराज सर्व समावेशक भक्त परिवार
(क) श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भक्त परिवार
(ड) श्रीराम उपासना मंडळ (श्री ब्रम्हचैतन गोंदवलेकर महाराज भक्त परिवारासह).
(इ) श्री प्रल्हाद महाराज भक्त परिवार
(ई) श्री जनार्दन स्वामी (टाकरखेड वासी) भक्त परिवार
(उ) श्री ईशावास्यम गजानन महाराज मंदिर परिवार
(ऊ) श्री नाधसखा भक्त परिवार, (प.पु.श्री. जितेंद्रनाथ महाराज आशिर्वादीत)
(ए) श्रीमद भगवदगीता सामु, पठण महिला परिवार (श्री भगवान श्रीकृष्ण सत्संग परिवार) आणि इतर सर्व संतचरणी लीन असलेले सत्संग भक्त परिवार
उपरोक्त सर्व भक्त परिवार आणि आप्तेष्ट, खेहीजन, मित्रपरिवारास सविनय विनंती की शुक्र दि. २९.०३.२४ ला आपल्या भक्त परिवाराचे कमीत कमी २५ (प्रत्येक परिवाराचे) भक्त पुरुष / महिला अगत्य येण्याचे करावे सभेला सायं ०५ वा सुरुवात होईल. मंगल वेषात मनोर मांगल्य मंगल कार्यालयात यावे. सभेचे उद्देश पुढील प्रमाणे आहेत.
अमरावती शहरात दि. ०१ ते ०५ फेब्रु. २०२५ पा पाच दिवसांसाठी आपल्या सर्वांच्या सक्रिय सहकार्यान 'जागतिक सद्भाव जागृती संमेलन संपन्न होत आहे. या संमेलनात सद्भाव जागृती च्या दृष्टीने जागतिक स्तरावरून भारत देश आणि इतरही राष्ट्रातून सकारात्मक भाव जागृत ठेवून सामा स्तर हा आधिकाधिक जीवन पोषक कसा होईल या दृष्टीने एकत्र विचार मंधन घडवून आणावयाचे आहे. संपूर्ण देशातून विविध राज्यातून एकाच ध्येयाने प्रेरित असलेले ३०० ते ४०० प्रतिनिधी यावेत आणि इतर राष्ट्रातून प्रत्येकी १०, १० प्रतिनिधी सादर आमंत्रित आहेत. परस्परांच्या विचार मंथनातून आंतरराष्ट्रीय सामंजस्य दृढ व्हावे, परस्परांबद्दल सद्भाव निर्माण व्हावा आपला देश देशातील नागरीक देशाचे सामा. वातारण यांचे मध्ये निकोप सद्भावना दृढ व्हाव्यात. याच सदहेतूने परस्परांचे विचार ऐकून समजावून घ्यावेत. वरील ०९किंवा त्यापेक्षा अधिक सत्संग परिवाराने एकत्र येतांना प्रत्येक भक्त परिवारातील प्रत्येकी ११ कार्य प्रमुख म्हणून पुढाकार घ्यावा. म्हणजे ९९ कार्यकारी प्रमुख निश्चित करावे. आणि या ९९ प्रमुखांनी प्रत्येकी रु. ३१०० फक्त संकलीत करावे आणि एक वर्षासाठी ही रक्कम फिक्स डिपॉझीट करावी आणि इतर सर्व सहका-यांनी प्रत्येकी १०० जमा करावे म्हणजे जेणेकरून संमेलनासाठी स्वतःचा सहभाग होईल आणि त्यानंतर प्रत्येक राज्य व सहभागी राष्ट्राकडून सहयोग घेता येईल. साधारण संमेलनाचे स्वरूप असे ठरविता येईल.
दि.०१.०२.२५ ते ०५.०२.२५
(१) उद्घाटन (2) स्वागत (३) परस्पर परिचय (४) परस्पर परिचयातून काही अद्भूत स्वभाव वैशिष्ट्ये, गुणग्राहकता म्हणून घेता येण्यासारखे सद्गुण (५) परिसंवाद (६) वादविवाद (७) प्रवचने (८) व्याख्याने (९) देशप्रेमाची वैशिष्टयपूर्ण गाणी (१०) किर्तन - निश्चित झालेले राष्ट्रीय किर्तन-किर्तनकार श्री चारुदत्तजी आफळे (११) आंतरराष्ट्रीय नामांकित वाद्यवृंद विविध वादन (१२) विविध स्तरावर ज्यानामवंतांनी उत्कृष्ट कार्याबद्दल आपले नाव अजरामर केलं, त्यांच्या कार्याचा परिचय (१३) आंतरराष्ट्रीय स्तरावर शास्त्रीय नृत्याची ज्यांना जाण आहे त्यांचा प्रत्यक्ष सहभाग (१४) खंजिरी भजन (१५) प्रश्नोत्तर चर्चा आणि इतर
संमेलनात कालावधी येणे प्रमाणे सकाळी ०९ ते दुपारी ०९ आणि दुपारी ०४ ते रात्री ०८
सकाळी ७.०० चहा-दुध- कॉफी सकाळी ८ ते ९ अल्पोपहार विविध पेय. दुपारी १.30 ते 3.30 भोजन सायंकाळी ५.३० वा. फलाहार रात्री ८.३० ते १० ३० भोजन, या संदर्भात आपले विधायक विचार अवश्य मांडावेत. सर्वप्रथम आपण सेवाधारी कार्यकत्यांनी सहयोग राशी स्वेच्छेने
संकलित करूया आणि मग इतरांना सक्रिय सहकार्याचे आवाहन करूया.
विनित
आनंदघन आध्या. सेवाभावी संस्था (र.नं. F29562) अमरावती... संपर्क: ९६०७८१६४६२, ९६३७५२६३३३, ९४२०७२९४८९, ९४२०१८८९२९, ९४०५९०८९९९, ९९२२५७९०६२ जय गजानन श्री गजानन, श्री राम जय राम जय जय राम, जय गजानन श्री गजानन